Ad will apear here
Next
‘भाजपचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी काम करू’; रत्नागिरीचे पक्षाध्यक्ष अॅड. पटवर्धनांचा सत्कार


रत्नागिरी :
‘स्नेहभावनेतून करण्यात आलेला माझा सत्कार मी कृतज्ञतापूर्वक स्वीकारतो. पुढील कार्यकाळासाठी हा प्रेरणास्रोत ठरेल. नागरी सत्कार हे मी माझे भाग्य समजतो. भाजपचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांसह काम करीन,’ असे प्रतिपादन भाजपचे रत्नागिरीचे नूतन जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. शहरात नुकताच त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

स्वयंवर मंगल कार्यालयात मित्रमंडळींकडून हा सत्कार आयोजित करण्यात आला होता. प्रचंड पाऊस असूनही शेकडो लोकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. या वेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, ज्येष्ठ डॉक्टर रमेश चव्हाण, कामगार नेते सुधाकर सावंत, अॅड. विजय साखळकर, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव, संतोष प्रभू, चंद्रशेखर पटवर्धन आदी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, मोठा पुष्पहार, मानपत्र देऊन मान्यवरांनी अॅड. पटवर्धन यांचा सत्कार केला. सौ. अनुराधा पटवर्धन यांचा सत्कार मालती खवळे यांनी केला.

‘पक्षाचा जिल्हाध्यक्ष हे पद शासकीय नाही; पण वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न राहील. औद्योगिकीकरण वाढण्यासाठी, तसेच मुंबई विद्यापीठ उपकेंद्र खऱ्या अर्थाने उपकेंद्र व्हावे याकरिता प्रयत्न करीन. महिनाअखेरीस मुख्यमंत्री रत्नागिरीत येत आहेत. त्यांच्याकडे मागण्या नोंदवीन. कार्यकर्ता प्रामाणिक, पारदर्शी असावा, जनतेत मिसळणारा हवा. त्याला पुन्हा मानसन्मान मिळाला पाहिजे याकरिता पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याप्रमाणे जनतेच्या मनातील काम करू,’ असे अॅड. पटवर्धन म्हणाले.



डॉ. सुभाष देव म्हणाले, ‘दीपक कॉलेजला असताना डमी बँकेचा प्रकल्प केला होता. नंतर स्वरूपानंद पतसंस्था सुरू केली. दर वर्षी ३१ मार्चला सर्व व्यवहार पूर्ण केल्याचा त्याचा फोन चुकलेला नाही. एनपीए शून्य असल्याचे त्याने सांगितल्यावर आनंद होतो. त्याची कामावर निष्ठा आहे आणि कुठे सुरुवात करायची व थांबायचे कुठे हे त्याला कळल्यानेच तो यशस्वी झाला. हा माणसाच्या चांगुलपणाचा सत्कार आणि शब्दाला जागणाऱ्या दुर्मीळ व्यक्तीचा सत्कार आहे. समाजाने अशा प्रकारे चांगल्याच्या मागे उभे राहावे.’

डॉ. कद्रेकर म्हणाले, ‘जिल्हा नगर वाचनालयाला दीपक पटवर्धनांनी सांस्कृतिक केंद्र बनवले. ते जिथे जातील त्याचे सोने करतात म्हणजे त्यांचा परीस स्पर्श सर्वांना भावतो.’

चित्रकार सुहास बहुलकर म्हणाले, ‘दीपक पटवर्धन यांच्या कार्याला सलाम. त्यांनी नगर वाचनालय ऊर्जितावस्थेत आणले. लोकमान्य टिळक व सावरकर यांच्या विचारांनी मी भारलेला आहे. त्यांचे जीवन कळावे अशी एकही गोष्ट रत्नागिरीत नाही. ही गोष्ट करावी असे आवाहन पटवर्धन यांना केले आहे.’ 

‘दीपक पटवर्धन यांचा जन्म माझ्या स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये झाला आहे,’ असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. ते नक्कीच यशस्वी होतील, अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

चंद्रशेखर पटवर्धन यांनी प्रास्ताविकात सांगितले, ‘दीपक पटवर्धन हे निष्कलंक चारित्र्याचे आहेत. त्यांना आईने सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांच्या रूपाने आता रत्नागिरी भाजपलाही अच्छे दिन येतील. गाव पातळीपर्यंत विकास साधायचा आहे.’

अॅड. विलास पाटणे म्हणाले, ‘झपाट्याने काम करणाऱ्या दीपक पटवर्धनांना मी १९८२पासून ओळखतो. आता पक्षाने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. साधेपणा व पक्ष संस्कृती त्यांना पुढे न्यायची आहे. जिजाऊंनी शिवरायांना शिवनेरी किल्ला स्वराज्यात का नाही हे शल्य बोलून दाखवले होते. आज भाजपचा आमदार का नाही हे शल्य आमच्या मनात आहे. आमदार निवडून आला पाहिजे म्हणजेच पटवर्धनांचे अध्यक्षपद कारणी लागेल.’

त्यांचे कॉलेजपासूनचे मित्र प्रा. माधव पालकर म्हणाले, ‘आम्ही बीकॉमला एकत्र होतो, त्याला ३६ वर्षे झाली. दीपक म्हणजे थ्रीडी व्यक्तिमत्व आहे. ठाम विश्वा स, शिस्त आणि डिव्होटेड. त्यामुळे त्याच्या यशाचा वारू पुढे जातोय. स्वतःच्या हिमतीवर त्याने दमदार वाटचाल केली आहे.’ 

भाजपचे ज्येष्ठ नेते विजय पेडणेकर यांनी पटवर्धन यांची वादळ एवढ्या एका शब्दात स्तुती केली. 

राष्ट्रीय अल्पसंख्याक समितीच्या डॉ. नाहिदा शेख म्हणाल्या, ‘मी दिल्ली, जम्मू, पश्चिम बंगालमध्ये प्रभारी म्हणून काम पाहते. देशात भाजपची सत्ता असताना रत्नागिरी मागे का, याची अनेक कारणे आहेत; पण या अंधकारात दीपक प्रज्ज्वलित झाला आहे. हीच योग्य वेळ आहे. उशिरा का होईना त्यांना नेतृत्व करायला मिळाले. निवडणुकांच्या तोंडावर हे काम ते पार पाडतीलच. त्यांनी आमदारही व्हावे.’

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर म्हणाले, ‘पक्षातील आजची आव्हाने वेगळी आहेत; पण दीपकची तेवढी ताकद आहे. आवश्यक प्रतिभा व साधने आहेत. वसा घेतल्यावर ध्यास घ्यायचा हे त्याला कळते. त्याने विविध कार्यकर्त्यांची बांधणी संघटनेच्या माध्यमातून केली आहे.’ माजी नगरसेविका शिल्पा धुंदूर यांनी सांगितले, ‘दीपकची घोडदौड पाहून आनंद होतोय. हात लावू तिथे सोने करण्याची त्याची वृत्ती आहे.’

रा. स्व. संघाचे पदाधिकारी व खारवी समाज पतसंस्थेचे संतोष पावरी यांनी सांगितले, ‘निःस्वार्थी भावनेने काम करणारे आणि हिंमत न हरणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. सहकार भारतीचे कामही ते करत आहेत. यामुळे भाजपला चांगले दिवस येतील.’

रत्नागिरी अर्बन बँकेचे अध्यक्ष अॅ ड. सुजित झिमण म्हणाले, ‘जिल्हा बँकेची प्रगती करण्यात दीपक पटवर्धनांचा वाटा आहे. नाणार प्रकल्पाचा अभ्यास करावा, जिल्ह्यातील बेरोजगारी हटवण्यासाठी आणि मच्छीमारी, आंबा बागायदारांचे प्रश्न सोडवावेत.’

डॉ. दिलीप मोरे म्हणाले, ‘समाजात कार्यरत व्हावे, हे दीपकजी आईकडून शिकले. कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व यांचा त्रिवेणी संगम त्यांच्यात पाहायला मिळतो.’ 

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष माधव गोगटे म्हणाले, ‘प्रचाराच्या निमित्ताने माझी त्यांच्याशी ओळख झाली. निःस्वार्थी व्यक्तिमत्त्वामुळेच ते मोठे झाले. पूर्वी जिल्ह्यात भाजपचे आमदार होते, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य, सरपंच होते. आता भाजपचे गतवैभव परत आणू.’

कामगार नेते सुधाकर सावंत यांनी सांगितले, ‘राजकीय पार्श्वभूमी नसताना, सुवर्णाक्षरांनी लिहावे असे काम पटवर्धन यांनी सहकारात केले आहे. कायद्यातील बदलामुळे सहकारी संस्था गडबडल्या, तेव्हा दीपकजी मदतीला आले व न्याय मिळवून दिला. त्यांनी आमदार व्हावे ही समस्त रत्नागिरीकरांची इच्छा आहे आणि ती पूर्ण होणारच.’

दीपप्रज्वलनानंतर वेदमूर्ती प्रभाकर जोगळेकर व सहकाऱ्यांनी आशीर्वचन म्हटले. राजन पटवर्धन, साईनाथ नागवेकर, डॉ नितीन चव्हाण, दीपक साळवी, डॉ. कल्पना मेहता, मिलिंद करंदीकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी प्रवीण देसाई यांनी बनवलेली पटवर्धन यांच्या विविध कार्यक्रमांच्या छायाचित्रांची चित्रफीत दाखवण्यात आली. मानपत्राचे वाचन पूर्वा पेठे हिने केले. आनंद पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. विनायक हातखंबकर यांनी आभार मानले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZXWCD
Similar Posts
भाजपच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अॅड. दीपक पटवर्धन यांची निवड रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अॅड. दीपक मनोहर पटवर्धन यांची निवड झाल्याचे आठ जुलै रोजी जाहीर करण्यात आले. स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था, तसेच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय या संस्थांचे अध्यक्ष असलेले अॅड. पटवर्धन हे रत्नागिरी भाजपचे जुने-जाणते पदाधिकारी आहेत. सहकार
‘अर्थसंकल्प दिलासादायक’ रत्नागिरी : ‘अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा कठोर आर्थिक निर्णयांना मनापासून प्रतिसाद देणाऱ्या देशवासीयांना मोठा दिलासा आहे,’ अशी प्रतिक्रिया येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष, सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड. दीपक
रत्नागिरीत सीएम चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण रत्नागिरी : सीएम चषक कला, क्रीडा स्पर्धेच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे बक्षीस वितरण खातू नाट्यमंदिरात आठ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आले. विविध क्रीडा, कला स्पर्धांमध्ये ३५ चषक व अंतिम विजेत्या, उपविजेत्यांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले. यातील विजेते खेळाडू मुंबईत राज्य फेरीत सहभागी होणार आहेत. रत्नागिरी
रत्नागिरीत पाच डिसेंबरपासून ‘सीएम चषका’ला सुरुवात भारतीय जनता पक्षातर्फे (भाजप) राज्यभरात सीएम चषक कला, क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत पाच डिसेंबरपासून या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नसून, यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील भाजप, भारतीय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language